मुंबईच्या एका हॉटेलमध्ये खासदार मोहन देलकर हे मृतावस्थेत सापडल्याने एकचं खळबळ उडाली आहे. ते दादरा – नगर हवेलीचे खासदार होते. मरीन ड्राइव्ह येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला असून त्यांच्या मृतदेहाच्या बाजूला एक चिठ्ठी ही सापडली आहे. ती चिठ्ठी गुजराती भाषेत आहे. मात्र पोलिसांनी त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मरीन ड्राइव्हचे पोलीस अधिक तपास करत आहे. अशा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळळ्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कोण होते मोहन देलकर
मोहन देलकर हे 58 वर्षाचे होते. त्यांनी 7 वेळा संसदेत प्रतिनिधित्व केलं होतं. 1989 ते 2019 पर्यंत ते 7 वेळा खासदार राहिले. 1989 मध्ये त्यांना काँग्रेसकडून मिळालेल्या तिकिटावर त्यांनी खासदारकी मिळवली होती. त्यानंतर 1996 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून पुन्हा खासदारकी मिळवली होती. त्यानंतर ते भाजपात सामिल झाले. 1998 मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर खासदारकीचं पद भूषवलं. 2004 ते 2019 पर्यंत त्यांनी पुन्हा खासदार म्हणून काम केलं.
Comments
Loading…