in ,

MP Sunny Deol Missing पोस्टर्स व्हायरल; भाजप खासदार सनी देओलला शोधणाऱ्यास कॉंग्रेस देणार बक्षीस

भाजप खासदार आणि अभिनेता सनी देओल हरवल्याचे पोस्टर्स सध्या गुरदासपूर लोकसभा मतदार संघात आणि सोशल मिडीयावर व्हायरत होत आहे. या पोस्टर्समध्ये सनी देओल शोधणाऱ्यास कॉंग्रेस बक्षीस देणार असल्याचेही म्हटले आहे. ट्वीटरवरही पोस्टर्सवर भन्नाट कमेंटचा पाऊस पडतोय.

गुरदासपूर लोकसभा मतदार संघातील सर्वच ठिकाणी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सनी देओल हरवले असल्याचे पोस्टर्स लावेल आहेत. अशा आशयाची ही पोस्टर्स रेल्वेस्टेशन पासून तर चौकाचौकात लावली आहेत. तसेच ज्या व्यक्तीला सनी देओल भेटल्यास त्यांनी कॉंग्रेसच्या पठाणकोट कार्यालयाशी संपर्क साधून बक्षीस जिंकावे अशी ऑफरच काढली आहे. दरम्यान आता नेमका कोण सनी देओलला शोधतोय ? की सनी देओलचं स्वत;हून समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान याआधी सुद्धा अशाचप्रकारे सनी देओलचे पोस्टर्स व्हायरल झाले होते.या पोस्टर्सवर गुमशुदा की तलाश खासदार सनी देओल असे ही लिहिण्यात आली होते. बऱ्याच दिवसांपासून आमच्या भागात सनी देओल फिरकले नाहीत. हे पोस्टर्स पाहून तरी त्यांना खासदारकीची आठवण येईल, असे येथील नागरिकांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pfizer : भारतात लशींच्या पुरवठ्यासाठी बोलणी सुरू – फायझर

राहुल गांधींनी बदलेले ‘ट्विटर धोरण’, अनेकांना केले अनफॉलो