राज्यात परमबीर सिंह यांचा लेटरबॉम्ब आणि देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांतील भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफुटवर गेल्याचे चित्र होते. मात्र आता सरकार अॅक्शन मोडमध्ये येण्यासाठी आता केंद्रात आणि राज्यात हालचाली सुरु झाल्या आहेत. या मुद्यावरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.
सुप्रिया सुळे यांनी सोनिया गांधी यांच्यासोबत भेट घेतल्याची माहिती ट्विट करुन दिली. तुमच्याशी चर्चा करणे हे नेहमीच आनंददायी असते. तुमच्या बहुमोल मार्गदर्शनासाठी खूप खूप आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी होती, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
दरम्यान बुधवारी मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महत्त्वाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली.या बैठकीत भाजपला हल्ला परतवून लावण्यासाठी आपण एकत्रपणे लढले पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सांगितले. त्यामुळे आता महाविकासआघाडी काय करणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
Comments
Loading…