in

Angarki Sankashti Chaturthi 2021; अंगारकी संकष्टी चतुर्थीचा मुहूर्त आणि पूजा विधी

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी उद्या म्हणजेच 2 मार्च रोजी आहे. जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते, तेव्हा तिला ‘अंगारकी चतुर्थी’ म्हणून ओळखले जाते. म्हणून, या दिवसाला ‘अंगारकी संकष्टी चतुर्थी’, असे म्हणतात. दरम्यान जाणून घेऊया शुभ मुहूर्त आणि पूजेचे विधी.

शुभ मुहूर्त

  • संकष्टी चतुर्थी तिथी प्रारंभ – 2 मार्च रोजी सकाळी 5 वाजून 48 मिनिटांनी
  • संकष्टी चतुर्थी तिथी समाप्ती- 3 मार्च सकाळी 2 वाजून 59 मिनिट

पूजा विधी

भल्या पहाटे उठून सर्व कामं आटोपून स्नान करा. यानंतर गणपतीचं प्रार्थना करा. यानंतर चौरंगावर स्वच्छ पिवळ्या रंगाचं वस्त्र अंथरा, त्यावर गणपतीची मूर्ती ठेवा. आता गंगा जल शिंपडून संपूर्ण स्थान पवित्र करा. यानंतर फूलांच्या मदतीने गणपतीला जल अर्पण करा. मग लाल रंगांचं फूल, जान्हवं, धूप, पानात सुपारी, लवंग, इलायची आणि एखादी मिठाई ठेवा. यानंतर नारळ आणि प्रसादात मोदक अर्पण करा. गणपतीला दक्षिणा अर्पण करुन 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा. सर्व सामग्री अर्पण केल्यानंतर धूप, दिवा आणि उदबत्तीने गणपतीची आरती करा.यानंतर वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥ या मंत्राचा जाप करा. किंवा ॐ श्री गं गणपतये नम: चा जाप करा. शेवटी मुहूर्ताच्येवेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करुन तुमच व्रत पूर्ण करा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाशिक मनपा हद्दीतील शाळा पुन्हा बंद

दिलासादायक; नवीन कोरोना रुग्णसंख्येत 2 हजाराने घट