मुंबई विमानतळावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ने मोठी कारवाई केली आहे. मुंबई विमानतळावर एनसीबीने 9 कोटींचं हेरॉईन जप्त केली आहे. या प्रकरणी परदेशी नागरिकत्व असलेल्या महिलेला अटक करण्यात आली आहे. या महिलेकडून 2.96 किलो हॅरोइन ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या हॅरोइनची किंमत 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव खाणीयसिले प्रॉमिसे असे आहे. ही महिला मुंबईहून जोहान्सबर्ग येथे जात होती. या महिलेला ताब्यात घेऊन तिच्या सामानाची झडती घेतली असता एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तिच्या बागेत एक चोर कप्पा आढळून आला आणि त्या चोर कप्प्यात 2.96 किलो हेरॉईन सापडलं.
Comments
Loading…