in ,

मुंबईतील Blackout घातपात ?

१२ ऑक्टोबर 2020 रोजी मुंबईत झालेल्या पॉवर कटमध्ये चीनचा हात असल्याचा दावा एका अमेरिकन अहवालातून करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात
या संदर्भात लिहून आले आहे. या अहवालामध्ये पॉवरकटचा संबंध भारत – चीन यांच्या मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीशी आहे असा दावा देखील करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये मुंबईत झालेला Blackout हा घातपात असल्याचा संशय अधिकच बळावत जात आहे.

ऑक्टोबर महिन्यात भारताच्या आर्थिक राजधानीत वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारच्या घटनेचा थेट संबंध भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोऱ्यात सुरु असणाऱ्या संघर्षाशी असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या अहवालात या बद्दल लिहण्यात आले आहे. यामध्ये चीननं आपल्या हॅकर्सच्या मदतीनं भारतात ब्लॅकआऊट करण्याच्या तयारीत होता. तसंच भारताला अंधारात ढकलण्याची त्यांची तयारी होती असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. चीन हॅकर्सची एका टीमनं ऑक्टोबर महिन्यात केवळ पाच दिवसांमध्ये भारतातील पॉवर ग्रिड, आयडी कंपन्या आणि बॅकिंग सेक्टर्सवर ४०,५०० वेळा सायबर हल्ला केला होता. भारताच्या पॉवर ग्रिडविरोधात एक व्यापक चिनी सायबर मोहीम सुरू करण्यात आल्याचंही या अभ्यासात म्हटलं आहे.

या पाश्वभूमीवर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सायबर विभागाकडून सायंकाळी या वीज पुरवठा खंडीत प्रकरणाचा अहवाल येणार असून सर्व स्पष्टीकरण देईल, असे आज विधिमंडळात सांगितलं. ”मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचे सुचवले होते. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. यासंदर्भात सायबर विभागाकडून मला संध्याकाळी 6 वाजता अहवाल देण्यात येईल. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर हा रिपोर्ट मला मिळेल, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

वीज पुरवठा खंडित
१२ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी मुंबईत वीज पुरवठा खंडित झाल्यानं खळबळ माजली होती. तसंच मुंबईतील ऑफिस, रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर्स चालवण्यासाठीही आपत्कालीन जनरेटर्सची मदत घ्यावी लागली होती. इतकंच नाही तर शेअर मार्केटचं कामकाजही बंद झालं होतं. हे दशकांमधील सर्वात मोठा वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार होता. परंतु २ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वीज पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला होता. यापूर्वी ही नोव्हेंबर महिन्यामध्ये मुंबईतील वीजपुरवठा खंडित होण्यामागे ठाणे जिल्ह्यातील पडघा येथे लोड डिस्पॅच सेंटरमधील ट्रीपिंगमुळे हा वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडल्याचा दावा महाराष्ट्र पोलिसांच्या साबयर विभागाकडून करण्यात आला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शरद पवार लस घेण्यासाठी जे जे रुग्णालयात दाखल

Gold Price Today : सोनं झालं स्वस्त