in

मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही

मुंबई | जागतिक महामारी कोरोनाच्या प्रादुर्भात पहील्यांच देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीत शुन्य कोविड मृत्यू आढळून आले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाव्हायरस साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर प्रथमच मुंबईत गेल्या 24 तासांमध्ये कोविड मृत्यूची नोंद केली नाही. देशाची आर्थिक राजधानी, साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक शहर होते. तरी आज कोविडची 367 रुग्न नोंदवले गेली आहेत.

मुंबई महानगरात पॉझिटीवीटी 1.27% पर्यंत घसरला आहे ज्यात आता 5,030 अॅक्टीव रुग्ण प्रकरणे आहेत. मुंबईचा आजचा रिकव्हरी रेट 97%आहे. शहरात गेल्या 24 तासांमध्ये 28,600 हून अधिक चाचण्या घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.शहरात कोणतेही कंटेनमेंट झोन सक्रीय नसले तरी 50 इमारती अजूनही सीलबंद आहेत.

साथीच्या दुसऱ्या लाटे पीकवर असताना मुंबई शहरात कोविडची एका दिवसात 11,000 पेक्षा जास्त प्रकरणे दिसून आली होती. या वर्षाच्या सुरुवातीला दैनिक कोविड वाढीच्या दरम्यान, शहराला आरोग्य सेवा पायाभुत आणि रुग्णांसाठी वैद्यकीय ऑक्सिजनच्या तीव्र तुडवड्याचा सामना करावा लागला. प्राणघातक विषाणूची लागण झालेल्यांना रुग्णालयातील बेड आणि औषधे मिळवण्यासाठी कुटुंबांनी धडपड केली. स्मशानभूमीवर दररोज मृत्यूची एक विलक्षण संख्या दिसून आली होती. मुंबईत आतापर्यंत कोरोनाव्हायरसच्या 7,50,808 प्रकरणांमध्ये 16,180 मृत्यू झाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विजेची तार तुटल्याने आठ एकर ऊस जळून खाक!

आ.संदिप क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून नगर रोडवरील खड्डे बुजवण्यास सुरूवात