in

मुंबईतील सर्व कोव्हिड केंद्र सुरू करा; आयुक्तांचे आदेश

Hyderabad: A medic looks on at a patient who has shown positive symptoms for coronavirus (COVID -19) at an isolation ward in Hyderabad, Tuesday, March 10, 2020. (PTI Photo) (PTI10-03-2020_000060B)

कोरोनाच्या रुग्णात पुन्हा एकदा वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये संचारबंदीदेखील जारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व कोविड केंद्र एका आठवड्याच्या कालावाधीत सुरू करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.

मुंबई मनपानं दिलेल्या माहितीनुसार, कोरोना केअर सेंटरमध्ये ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यापैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत, तर ९७५७ खाटा राखीव आहेत. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे कोव्हिड केअर सेंटर्स बंद करण्यात आले होते, तर ७ जम्बो कोविड केंद्र आणि प्रत्येक विभागात एक असे एकूण २४ कोविड सेंटर्स ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती.

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. यामुळे विदर्भातील अकोला, यवतमाळ, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यात काही अटी शर्थींसह संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई मनपा आता युद्धपातळीवर काम करताना दिसत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परिस्थिती बिघडली तर मुंबईत पुन्हा लॉकडाउन – पालकमंत्री अस्लम शेख

…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत – संजय राऊत