लिलावासाठी काही मिनिटं शिल्लक असताना मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूचे मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे T-20 स्पर्धेतून ब्रेक घेतल्याचं समजत आहे. त्यामुळे आता मुंबई इंडियन्ससमोर संघाच समतोल राखण्याच मोठ संकट उभ राहील आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉकने यावेळी मानसिक स्वास्थ बिघडल्यामुळे एक ब्रेक घेतल्याचे ठरवलं आहे. डी कॉकला यावेळी क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे आता किती दिवस T-20 स्पर्धेतून ब्रेक घेणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ब्रेक घेतल्यामुळे डी कॉक स्थानिक T-20 सामन्यात खेळणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे पण आयपीएल ( IPL) मध्ये खेळण्याबाबत अजुनही साशंकता आहे.
यावेळी आयपीएल भारतात खेळवली जाण्याची शक्यता जास्त आहे. या गोष्टीचा त्रास डी कॉकला पुन्हा होऊ शकतो अशी भीती डॉक्टरांना आहे त्यामुळे अजुनही आयपीएल मध्ये खेळण्याबाबत अजून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही
डी कॉक हा मुंबई इंडियन्स संघाचा अत्यंत महत्वाचा खेळाडू आहे. त्याने नेहमीच विकेट कीपिंग आणि फलंदाजी मध्ये संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
Comments
Loading…