in

मुंबईत जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज- काकणी

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. राज्यात मुंबईत कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक सापडत आहे. याच पाश्वभूमीवर जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सज्ज होणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी दिली. राज्यातील नाशिक, पुणे, बुलडाणा, अमरावती या शहरात कोरोनामुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. मुंबईसह राज्यातील नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक या शहरात कोव्हिड सेंटर हळूहळू पुन्हा सुरु करण्यात येतं आहेत.

काही दिवसांपुर्वी युकेतला कोरोनाचा नविन स्ट्रेन समोर आला होता, मात्र आता त्या स्ट्रेनवर नियंत्रण आहे पण कोरोनाचा उद्रेक पुन्हा मुंबईसह राज्यात होतं आहे. मुंबईत कोरोनाचा आधी झालेल्या उद्रेकामुळे अनेक अडचणीना सामोरं जावं लागलं होतं. थोड्या दिवसांपूर्वी लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण जास्त वाढले तर लॉकडाऊन सारखे निर्णय पुन्हा घ्यावे लागतील, यासह एक आठवड्याचा अवधी मुंख्यमंत्र्यांनी दिला आहे. तेव्हा आता कोरोना नियंत्रणात राहावा यासाठी कोरोना सेंटर पुन्हा उघडण्यात येतील. यासह क्वारंटाईन सेंटरही पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lokshahi Impact; भात गिरणी मालकाला आलेल्या ८० कोटीच्या बिलाची महावितरणाकडून दुरुस्ती

”भेंडी बाजार, बेहराम पाड्यात चक्कर मारावी”, पालकमंत्र्यांना ‘मनसे’ सल्ला