in

Mumbai Local | लोकलसंबंधी येत्या दोन दिवसात निर्णय घेऊ, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील

महाराष्ट्र कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या ही जळवपास आटोक्यात आली आहे. त्यामुळे राज्यात लागू करण्यात आलेले लॉकडाऊनसह इतर निर्बंध कोरोनाचे रुग्ण कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्यातील निर्बंध शिथिल करण्यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे. येत्या दोन दिवसात निर्बंध शिथिल करण्यासह लोकलसंबंधी निर्णय घेऊ शकतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यातल्या 11 जिल्ह्यांमध्ये रुग्णवाढीचं प्रमाण अजूनही जास्त आहे. त्यामुळे तेथील निर्बंध शिथील केले जाणार नाही. इतर जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत जे काही तिसऱ्या टप्प्याचे निर्बंध आहेत ते शिथिल करण्यासंदर्भात आरोग्य विभागाच्या आणि मदत व पुनवर्सन विभागाच्या सूचना मिळून मुख्यमंत्र्यांकडे फाईल पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.

लोकलसंदर्भातही लवकरच निर्णय

सध्या सामान्य रेल्वे प्रवाशांना लोकल ट्रेननं प्रवास करण्याची मुभा नाही आहे. त्यामुळे यात लस घेतलेल्यांना लोकलनं प्रवास करण्याची परवानगी द्यायची का नाही यावर देखील येत्या दोन ते तीन दिवसात निर्णय होईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

साराचा बोल्ड लूक पाहिलात का?

Petrol Diesel Prices | पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आजचे दर