in

Mumbai Metro 3 | भुयारीकरणाचा 36वा टप्पा पूर्ण

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनद्वारे आज सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1) स्थानक हा १.५ किमी इतका लांब ३६वा भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण करण्यात आला. यावेळी तापी-१ आणि तापी-२ या दोन टनेल बोअरिंग मशिन्स (टीबीएम) च्या मदतीने पॅकेज-६ ने एकूण ४.४ किमीचे भुयारीकरण पूर्ण केले आहे.\

शुक्रवारी मेट्रोच्या पॅकेज-६ मधील भुयारीकरण १००% पूर्ण करून मुं.मे.रे.कॉने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या पॅकेजमधील दोन स्थानके आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनलवर आहेत. या दोन्ही स्थानकांना एअरपोर्ट टर्मिनलशी जोडले जाईल त्यामुळे विमानतळापर्यंत प्रवास करणे प्रवाश्यांना अधिक सोयिस्कर होणार आहे.’’ असे मुं.मे.रे.कॉ चे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी सांगितले.

“हार्ड रॉक तंत्रज्ञानाने सुसज्ज टेराटॅक निर्मित टीबीएम तापी -१ आणि २ द्वारे १५ महिन्यात भुयारीकरण पूर्ण करण्यात आले आहे. आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1) स्थानकाचे जवळपास ७६.४% बांधकाम पूर्ण झाले आहे”, असे मुं.मे.रे.कॉ चे संचालक (प्रकल्प) एस. के. गुप्ता यांनी सांगितले.

पॅकेज-६ अंतर्गत आंतरदेशील विमानतळ (CSMIA-T1), आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA-T2) आणि सहार रोड मेट्रो स्थानकांचा समावेश असून या पॅकेजमध्ये खालीलप्रमाणे ४ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत.

  • आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA-T2), ते सहार रोड (अपलाईन – ६८७ मीटर आणि डाउनलाईन – ६९२ मी),
  • (सहार रोड ते आंतरदेशीय विमानतळ (CSMIA-T1), (अपलाईन – १५१५ मीटर आणि डाउनलाईन – १५१२ मीटर)
  • मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण ५०.३ किमी (९३%) भुयारीकरण पूर्ण झाले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अमरावतीत कोरोनाचे रुग्ण वाढल्याने शाळा बंद

प्रेमाचा अनोखा रंग दाखवणारा ‘प्रीतम’ लवकरच चित्रपटगृहात, 19 फेब्रुवारीला होणार प्रदर्शित