in

Mumbai Metro | आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर भाजपचं काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन

मुंबई मेट्रोच्या ट्रायल रन कार्यक्रमाच्या उद्घाटनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निषेधार्थ मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी भाजपच्यावतीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.

भाजप सरकारच्या काळात प्रगतीपथावर असलेल्या मेट्रोचे काम आधी हट्टापायी रखडवून, नंतर प्रकल्प किंमत वाढवून आता श्रेयासाठी लाखो रुपयांची जाहिरातबाजी केल्याचं म्हणत महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी आकुर्ली मेट्रो स्टेशनबाहेर फलक दाखवून जोरदार घोषणाबाजीही केली. पोलिसांनी आमदार भातखळकर यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना अटक केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील गर्दी वाढल्यास निर्बंध आणखी कडक करणार – मुख्यमंत्री

Monsoon | येत्या तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस