कोरोना विषाणू आटोक्यात येत असल्याचे दिसत असतानाच त्याचा पुन्हा फैलाव होऊ लागला आहे. राज्यात दोन हजारांच्या खाली आलेली नव्या रुग्णांची संख्या आता थेट सात हजारापर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांच्या संख्येतही तिपटीने वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. त्यापाठोपाठ महापालिकेनेही नियमावलीचे पालन न केल्यास लॉकडाऊन लागेल, असा इशारा दिला आहे.
कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे यासंबंधीची जी बंधने आहेत, ती पाळावीच लागेल. घराबाहेर पडताना मास्क, हाताला सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर हे पाळायलाच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळेच ‘मी जबाबदार’ या नव्या उपक्रमाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबईतही अशीच बेफिकीरी पाहायला मिळते. लोक मास्क न घालता बाहेर फिरताना सर्रास दिसतात. मुंबईत पुढील 8 ते 15 दिवस महत्त्वाचे आहे. लोकांनी शिस्त पाळली नाही, तर लॉकडाऊन अटळ आहे, असा इशारा पालिकेने दिला आहे.
पालकमंत्र्यांकडूनही इशारा
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण त्याचबरोबर मुंबईकरांनी देखील कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे, अन्यथा नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.
Comments
Loading…