in

सुबोध जयस्वाल यांना नोटीस; 14 ऑक्टोबरला हजर राहण्याचे निर्देश

सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांनी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली आहे. 14 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. फोन टॅपिंग आणि डेटा लीकप्रकरणी नोटीस देण्यात आल्याची माहिती आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ‘फोन टॅपिंग आणि डेटा लीक’ प्रकरणी महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक आणि सीबीआयचे संचालक सुबोध जयस्वाल यांना नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 14 ऑक्टोबरला सीबीआय संचालकांना चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआयचे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने पोलिसांच्या बदली-पोस्टिंगवरील महाराष्ट्र गुप्तचर विभागाचा डेटा लीक केल्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लखीमपूर खेरी हिंसाचार : मंत्रिपुत्र आशिष मिश्राला अटक

पोलिसांनी केला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश