in

Mumbai – Pune | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुबंई-पुणे एक्सप्रेस वेवर एका कंटेनरने मागून टेम्पोला धडक दिली. टेम्पो पलटी झाल्यावर मागून येणाऱ्या दोन कार टेम्पोला धडकल्या. या चारही गाड्यांवर पाठीमागून येणारा टेम्पो धडकल्याने अपघाताची भीषणता आणखी वाढली. या अपघाताचे दोन्ही कारचा चक्काचुर झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात झाला असून या अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर पाच जण जखमी झाले आहेत. टेम्पो, ट्रेलर, कार सह अनेक गाड्या एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला आहे.

पुण्याहून मुबंईकडे जाताना बोरघाट उतरताना फुडमॉल जवळ हा झाला अपघात. या अपघातातील दोन जखमीनां अष्टविनायक (पनवेल) आणि अन्य दोघांना वाशी येथे मनपा रुग्णालयात आणि एकाला इतर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तर मृतांना खोपोली रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर शवविच्छेदन करण्यात येईल.
कसा घडला अपघात?

पाच वर्षांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डॉ. वैभव वसंत झुझांरे (41, नेरुळ) याच्यांसह त्यांची पत्नी वैशाली झुंझारे (38), आई उषा झुंझारे (63), पाच वर्षांची मुलगी श्रिया झुंझारे (5) या चौघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक 11 वर्षांचा मुलगा अर्णव झुंझारे हा गंभीर जखमी झाला आहे. त्यासह मंजू प्रकाश नाहर (58, गोरेगाव) यांचाही मृत्यू झाला आहे.

तर, स्वप्नील सोनाजी कांबळे (30), प्रकाश हेमराज नाहर (65), किशन चौधरी, काळूराम जमनाजी जाट हे या अपघातात जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मालाडमध्ये मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल, आरे वाचविण्यासाठी धावलेले पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे मौन का?

फास्टॅग सक्तीबाबत महत्वाची बातमी, फास्टॅगसक्ती महिन्याभरानंतर