in

अमेझॉन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ चित्रपटाचे निर्माते अडचणीत

अमेझॉन प्राईमवरील ‘मुंबई सागा’ या चित्रपटात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खोडसाळपणे व अपमान करीत मानहानीकारक चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील स्वयंसेवक महेश भिंगार्डे यांनी ही नोटीस निर्मात्यांना पाठवली. दरम्यान चित्रपटातील संबंधित प्रसंग आणि संवाद काढून टाकावेत आणि बिनशर्त माफीही मागितली जावी, अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

या चित्रपटातील एका प्रसंगामुळे संघाची मानहानी होत आहे. तर संघ आणि स्वयंसेवकांबाबत चुकीचा संदेश समाजात पोहोचवला जात असल्याचेही भिंगार्डे यांनी पाठवलेल्या या नोटीसमध्ये म्हटले आहे. मुंबई सागा या चित्रपटातील अभिनेत्यांच्या संवादातून कोण्या भाऊच्या संघटनेचा उल्लेख केला गेला आहे. या भाऊच्या संघटनेतील सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हुबेहूब गणवेशात अगदी अस्खलितपणे दाखवले आहेत. तसेच हा चित्रपट सत्यघटनेतून प्रेरित असल्याचे याच्या सुरुवातीलाच सांगितले गेले आहे.

या चित्रपटातील संबंधित चित्रण व संवाद काढून टाकावेत. ही नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत संबंधित प्रसंग व संवाद चित्रपटातून काढून टाकले जावेत. तसेच ही बदनामी केल्याबद्दल बिनशर्त माफी मागावी व त्याला प्रसार माध्यमातून व्यापक प्रसिद्धी दयावी अशी मागणी आम्ही या नोटिसद्वारे केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC आरक्षणावरून भाजपा आक्रमक, राज्यातील विविध भागांत तीव्र आंदोलन

‘शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच’