मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी सत्र 5 या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. परीक्षेचा निकाल 91.95 टक्के लागला असून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या या परीक्षेसाठी 5 हजार 423 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5 हजार 375 विद्यार्थ्य़ांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. चार हजार 798 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. तर, 419 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
मुंबई विद्यापीठाने आतापर्यंत आर्किटेक्चर चौथे वर्ष, एमएमएस सीबीएसजीएस सत्र 4, एमएमएस चॉइस बेस सत्र 4, एमएमएस चॉइस बेस सत्र 3, एमएमएस चॉइस बेस सत्र 4, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉइस बेस सत्र 3, बीई प्रिंटिंग अॅण्ड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सत्र 7, चॉइस बेस व बीएससी आयटी सत्र 5 अशा 7 सात परीक्षांसह 73 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले आहेत.
Comments
Loading…