in

Mumbai Weather : अवकाळी पावसानंतर मुंबईत दाट धुक्याची चादर

मुंबईत पावसानंतर दाट धुक्याची चादर पसरली आहे. तर पश्चिम उपनगरात आज हवेत गारवा आहे. गेले तीन दिवस अवकाळी पावसानंतर मुंबईचा पारा बऱ्यापैकी खाली आला आहे.

मुंबई मध्ये हे प्रचंड धुके पसरल्याने आज पहाटे पासून मुंबईचे वातावरण आल्हाददायक वाटत आहे. मात्र, याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. या वातावरणात मुंबईकर मात्र पहाटे या धुक्याचा आणि थंडीचा आस्वाद घेण्यास बाहेर पडले आहेत. व्यायाम आणि जॉगिंग करण्यासाठी आणि या वातावरणात फिरण्यासाठी मुंबईकर मोठया प्रमाणत बाहेर पडले आहेत.

अरबी समुद्रातील निर्माण झालेली कमी दाबाची स्थिती निवळत आहे. त्याचप्रमाणे कुठेही नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला नाही. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसाळी वातावरण दूर होऊन कोरडे हवामान निर्माण होण्याचा अंदाज आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“खुंटा बळकट करण्यासाठीच गुजरातचे मुख्यमंत्री इथे…” संजय राऊत

बाबरी मशीद विद्ध्वंस दिनाला 29 वर्षे पूर्ण; जाणून घ्या काय आहे संपूर्ण घटनाक्रम