in

मुंबईकरांना वाटते ‘लोकल’च बेस्ट!

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल 1 फेब्रुवारीपासून सुरू झालेली आहे. मर्यादेत वेळेत लोकल सेवा सुरू झाली असली तरी लोकांचा चांगला प्रतिसाद लोकलला मिळत आहे. परंतु यामुळे कोरोनाच्या काळात मुंबईकर प्रवासांची ने आण करणारी बेस्टच्या प्रवासांच्या संख्येत घट होताना दिसून आले आहे.

उपनगरी लोकल सुरु होण्यापूर्वी 29 जानेवारीला बेस्ट प्रवाशांची संख्या 26 लाख 62 हजार 402 होती. तर तीच प्रवाशी संख्या 1 फेब्रुवारीपासून लोकल सुरू झाल्यानंतर रोजी प्रवासी संख्या 25 लाख 85 हजार 358 आहे. तर दरदिवशी प्रवासी संख्या घटत असून 5 फेब्रुवारीची प्रवासी संख्या 25 लाख 38 हजार 210 आहे. मर्यादेत जरी लोकल सेवा सर्वसामान्य लोकांसाठी सुरू झाली असली तरी ज्या बेस्टमध्ये कोरोनाकाळात प्रवासी संख्या वाढत होती ती प्रवासी संख्या लोकल सेवा सुरू झाल्यावर कमी झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कानभट’ ठरला भन्नाट

कोरोनाचा फैलाव नेमका झाला कुठून? डब्ल्यूएचओच्या पथकालाही झाला नाही उलगडा