in

अंबरनाथमधील अनधिकृत गाळ्यांवर पालिकेने फिरवला बुलडोझर

मयुरेश जाधव । अंबनाथ शहरात पालिकेनं अनधिकृत गाळ्यांवर बुलडोझर फिरवला आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन चाळ परिसरात आज दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत अनधिकृत गाळे जमीनदोस्त केले.

अंबरनाथ पश्चिमेच्या वुलन चाळ परिसरात पालिकेचं वेल्फेअर सेंटर होतं. हे वेल्फेअर सेंटर धोकादायक बनल्यानं काही वर्षांपूर्वी ते पाडण्यात आलं. यानंतर त्याच जागेवर पालिकेनं प्रशस्त असा बेघर निवारा उभारण्याचा निर्णय घेत बांधकामाला सुरुवात केली. मात्र या जागेत तिथल्याच काही भूमाफियांनी हळूहळू अतिक्रमण करत काही गाळे उभारले होते आणि त्यात दुकानं, कार्यालयं थाटली होती. दुसरीकडे नवीन बांधकाम सुरू असलेल्या बेघर निवारा केंद्रातून साहित्य चोरीचं प्रमाण वाढलं होतं. त्यामुळं संरक्षक भिंत बांधणे गरजेचं असताना त्यात अतिक्रमणांचा अडथळा येत होता. त्यामुळे आज अखेर या अतिक्रमणांवर पालिकेनं धडक कारवाई करत सर्वच्या सर्व अनधिकृत गाळे जमीनदोस्त केले. या कारवाईवेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुणीही कारवाईला विरोध केला नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona; महाराष्ट्रात ६ हजार नवे बाधित; रिकव्हरी रेट ९६.६६ टक्के

Milk ATM ; भारीच! आता पुण्यात एटीएममधून मिळणार दूध