in ,

BMC global tender | महापालिकेचे ग्लोबल टेंडर गुंडाळणार?


मुंबईकरांना कोरोना लस मिळण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले होते. परंतु या टेंडरला पुरवठादारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले. ग्लोबल टेंडरची मुदत दोन वेळा वाढवल्यानंतर आज निविदा भरण्याची मुदत संपली. पुरवठ्यादारांकडून समाधानकारक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने येत्या तीन दिवसात ग्लोबल टेंडर गुंडाळावे लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेकडून पुरवठादारांच्या कागदपत्रांची छाननी सुरु आहे. अद्याप कोणत्याही पुरवठादाराची निवड करण्यात आलेली नाही. पुढच्या तीन दिवसांत छाननी प्रक्रीया पूर्ण करुन निर्णय घेतला जाईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले. मात्र, पुढच्या तीन दिवसांत निविदा भरलेल्या पुरवठादारांच्या कागदपत्रांची समाधानकरक पूर्तता झालेली न आढळल्यास ग्लोबल टेंडर गुंडाळावे लागणार असे समजते. आतापर्यंत एकूण ९ पुरवठादारांनी निविदा भरल्या आहेत. त्यामुळे मोठा गाजावाजा करुन काढलेले ग्लोबल टेंडर फुसका बार ठरणार का? की खरोखरच मुंबईला लस मिळणार हे येत्या तीन दिवसांत कळेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold Price | सलग दुसर्‍या दिवशी सोनं महागलं

Raj Thackeray | अतुल भातखळकरांनी मनसेचं तिकीट मागितलं होतं – राज ठाकरे