in ,

पुण्यात अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांसमोर हजर, इतर तिघेही अटकेत

पुण्यातील बिबवेवाडी येथे एका अल्पवयीन मुलीची क्रूरपणे हत्या केल्याची घटना घडली आहे. या कबड्डीपटू मुलीच्या खून (Kabaddi Player Murder in Pune) प्रकरणातील मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला आहे. पोलिसांनी अन्य तीन जणांनाही अटक केली आहे. या प्रकरणी तातडीनं तपास करून, लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्यात येईल, अशी माहिती पुणे पोलिसांकडून मिळत आहे.

बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे सराव करत असलेल्या १४ वर्षीय कबड्डीपटू मुलीवर कोयत्याने वार करून तिचे शिर धडावेगळे करत खून करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघांना अटक केली. तर, मुख्य आरोपी ओंकार उर्फ शुभम बाजीराव भागवत (वय २१, सध्या-रा. चिंचवड) हा स्वत: पोलिसांसमोर हजर झाला आहे.

एकतर्फी प्रेमातून नात्यातील मुलानंच हे कृत्य केल्याचं माहिती मिळाली असून आरोपी पाच वर्षांपासून मृत मुलीच्या शेजारी राहत होता. इतर आरोपी हे सोबत होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अज्ञात व्यक्तींनी पेटविले तीन एक्करवरील सोयाबीन

सलमान खानचा ‘अंतिम’ येणार ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला