in ,

साताऱ्यात भरदिवसा खून

शुक्रवारी सात्याऱ्यातील दिव्यनगरी तालुक्यात रियल इस्टेट एजंट संतोष उर्फ विठ्ठल जिजाबा सूळ यांचा भरदिवसा दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी ज्ञानेश्‍वर जिजाबा सूळ यांनी जीवन निकम, प्रमोद जाधव आणि अनोळखी संशयितांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष सूळ हे मूळचे फलटण तालुक्‍यातील आदर्की या गावचे रहिवासी असून, त्यांनी 2007 साली आवाडवाडी येथे शंभर गुंठे जमीन खरेदी केली होती. ते पत्नी, मुलासह आवाडवाडी येथे राहात असून गेली कीत्येक वर्षे रियल इस्टेट एजंट म्हणून साताऱ्यात काम करत होते.

सूळ हे शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यानंतर ज्ञानेश्‍वर सूळ यांनी सकाळी सव्वानऊच्या सुमारास संतोष सूळ यांना फोन केला.त्यावेळी संतोष यांनी कामात असल्याचे सांगून फोन कट केला. दरम्यान, दिव्यनगरी येथील एक वकील दहा वाजण्याच्या सुमारास रस्त्याने निघाले असता, संतोष सूळ हे जखमी अवस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तातडीने ज्ञानेश्‍वर यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर ज्ञानेश्‍वर यांनी घटनास्थळी धाव घेत, संतोष यांना उपचारासाठी साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी संतोष यांनी आपल्याला दोन संशयितांची नावे ज्ञानेश्‍वर यांना सांगितली.

त्यानंतर थोड्या वेळाने संतोष यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी दिव्यनगरीकडे धाव घेतली. त्यावेळी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. याप्रकरणी काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्‍वर दळवी तपास करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपा जिल्हाध्यक्ष गोडेंचा राजीनामा नाट्य

तळेगाव ठाण्यात डीजे वाजवल्याचे प्रकरण अंगलट