in

गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्याकांडाचा उलगडा… तिघांना अटक

गोपाल व्यास, प्रतिनिधी

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला बंदुकीच्या गोळ्या झाडून एका इसमाची हत्या करून,नग्न अवस्थेत शेतात फेकले होते. हत्येची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी मृत व्यक्तीचे ओळख पटवली गेली. या तपासादरम्यान हा इसम नागपूरचा असल्याचं निष्पन्न झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा वाशिम यांनी तपास चक्रे फिरवीत शुभम कान्हारकर,विकल्प मोहोड,व्यंकटेश भगत सर्वजण नागपूर यांना अटक केली. सदर हत्याकांड आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे दिसून येत आहे.

नागपुरातून अपहरण करून मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेला माधव पवार आणि आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर येथे बिट कॉईन चा व्यवसाय होता. यामध्ये निशीद वर 500 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल आहे.यांच्यामध्ये आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाला असून,मयत माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईल मध्ये सर्व व्यवहाराची माहिती असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिलीय.

या प्रकरणात तीन पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपींना अटक केली.तर यामध्ये अजून तीन आरोपी फरार असून,याचा शोध घेणे सुरू आहे.दरम्यान लवकरच त्यांचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘दादा गाली देते हे, तारीफ भी करते हें’

धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदी भाजपचे प्रदीप कर्पे