in

एकतर्फी प्रेमातून भरदिवसा अल्पवयीन मुलीची हत्या

पाटण येथील चाफळ येथील सकाळी दहाच्या सुमारास एकतर्फी प्रेमातून भरदिवसा अल्पवयीन मुलीची हत्या झाली आहे. या थरारनाट्यामुळे चाफळ परिसरात तणाव निर्माण झाला आहे. अनिकेत मोरे (२२, रा.शिंरबे, ता. कोरेगाव) असे खून करणाऱ्या युवकाचे नाव आहे. खुनानंतर अनिकेत स्वतः पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आहे. पोलिसांसमोर त्याने गुन्हाही कबूल केल. या संदर्भात माहिती मिळताच मल्हारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली .

नक्की काय झालं ?
चैतन्या हिची आई जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका आहे. त्याची काही दिवसांपूर्वी चाफळनजीकच्या चाहुरवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेत बदली झाली आहे. त्यामुळे त्या मुलीसह चाफळला राहतात. संशयित अनिकेत व चैतन्या एकाच तालुक्यातील असल्याने त्यांचा परिचय होता. त्यात अनिकेतचे चैतन्यावर एकतर्फी प्रेमही होते. त्यातून तो तीला भेटायला येत होता. अनिकेतने मागील काही दिवसापूर्वी चैतन्याच्या आईची भेट घेवून लग्नास मागणी केली होती. अनिकेत मजुरीवरील शेतातील कामे करतो. अनिकेत आजही चाफळ येथे दुचाकीवरून आला होता. येथील स्वागत कमानीजवळ तो मृत तरुणीला भेटला. त्यांच्यात काही बेलणे होण्यापूर्वीच त्याने तीचा तोंड दाबून त्याच्याकडे असलेल्या चाकूने तीचा गळा चिरला. त्यात ती जागीच ठार झाली. सकाळी दहाच्या सुमारास थरारनाट्य घडले. त्यामुळे ग्रामस्थांत धावपळ उडाली. भर चौकात झालेल्या थरार नाट्यामुळे ग्रामस्थांत घबराट पसरली आहे.खुनानंतर सशयित अनिकेत पोलिसांत हजर झाला आहे. त्यावेळी पोलिसांनी खुनाची माहिती समजली. त्यांचीही धावपळ उडाली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी पंचानामा केला अशी माहिती पोलिसांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्रातील २५० मेगावॅट संच करण्यात आला बंद

Sharia | शरिया’ सारखा कायदा आणा, मगच बलात्कार थांबतील