in

कोट्यवधीच्या लालसेतून वेगवेगळ्या घटनेत दोन ‘वसंत’ची हत्या

भूपेश बारंगे, वर्धा | वर्ध्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रहस्यमय हत्यांमुळे वर्धा जिल्हा हादरला आहे. या दोन्ही हत्यात ‘वसंत’ नावाचे व्यक्तींचा खून झाल्याने हा योगायोग की नशीब असा सवाल आहे. दोघंही जणांचा संपत्तीच्या लालसेतून हत्या झाल्याची माहिती आहे. दरम्यान या हत्यांच्या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा वसुरक्षिततेचे एक नवे आव्हान पोलिसांसमोर उभे झाले आहे.

वर्धा शहारानजीक असलेल्या रोठा तलावात पालोती येथील वसंत चोखोबा हातमोडे या 64 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या सखोल तपासात तलावातील विहिरीत पोलला बांधून या वृद्धांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुलगाव येथील कोट्यवधी रुपयात विकल्या गेलेल्या शेताच्या मोबदल्यासाठी वृद्धाचा खून झाल्याची बाब चौकशीत समोर आलीय. वर्धा नगर परिषदेच्या पूर्व नगराध्यक्षाचा पती तथा कामगार नेता या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले. पोलिसांनी या प्रकरणात कामगार नेता भास्कर दादाराव इथापे, विलास मून आणि दिलीप नारायण लोखंडे या तिघांना अटक केली आहे. वर्धा पोलीसांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.

देवळी येथील हत्येच्या घटनेत सुरक्षा रक्षक वसंत भाऊराव ढोणे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. मृतक व त्याच्या नातेवाईकामधील संपत्तीतून आर्थिक देवाण घेवाणीचा वाद याला कारण ठरलाय. तब्बल 1 लाख 30 हजाराच्या सुपारीत ही हत्या करण्यात आली. या खुनाच्या आरोपाखाली पोलिसांनी हिंगणघाट तालुक्यातील वाघोली येथील नामदेव गणपत तळवेकर, प्रेम नामदेव तळवेकर,साहिल वासुदेव तळवेकर, भिडी नजीकच्या दुर्गवाडा येथील शंतनु धर्मपाल मून, मिथुन नारायण चिकराम, अमर बाबाराव मून तर देवळी येथील अनिकेत भीमराव मडावी या सात आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी पोलीस कोठडी मागत सखोल तपास सुरू केला. संपत्तीच्या लालसेतून दोन हत्यांमुळे जिल्ह्यात गुन्हे वाढत असल्याचेच चित्र जिल्ह्यात आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Mumbai Bank scam | प्रविण दरेकर यांच्या अडचणीत वाढ ?

भिवंडीत 113 दिवस उड्डाणपूल वाहतुकीस बंद