in

रशियात दिसल्या रहस्यमयी रेषा, नासाचे वैज्ञानिकसुद्धा झाले हैराण

नासाने सादर केलेल्या सॅटेलाइट फोटोंनी संपूर्ण जगाला हैराणकरुन सोडलंय. या फोटोमध्ये रशियात भूवैज्ञानिक रेषांमुळे सर्वच वैज्ञानिक आवक झाले आहेत आता या रेषा कशा पडल्या, हा प्रश्न नासाच्या वैज्ञानिकांना पडलाय. सायबेरिया भागात मर्खा नदीच्या परिसरातून घेतलेल्या सॅटेलाइट फोटोंमधून या रेषा कैद करण्यात आल्याय.

नासा द्वारे अनेक वर्षांपासून लॅंडसॅड ८ ने कॅप्चर केलेल्या या फोटोंमध्ये जमिनीवर वेगळाच आकाराच्या रेषा दिसत आहे. मर्खा नदीच्या दोन्ही बाजूने दाट आणि हलक्या दोन्ही प्रकारच्या रेषा दिसत आहेत. या रहस्यमय रेषा सर्वच वातावरणात दिसून येतात. पण हिवाळ्यात बर्फामुळे या रेषा एकमेकांपासून वेगळ्या रहस्यमय रेषा स्पष्टपणे दिसत आहेत असा अंदाज वैज्ञानिक लावत आहेत .

या रहस्यमयी रेषाचा बर्फाशी संबंधित आहे असे म्हटले जात आहे . रशियाच्या या भागात काही दिवसांसाठीच जमीन दिसते आणि वर्षातले ९० टक्के दिवस येथील जमीन बर्फाने झाकलेली असते. काही वैज्ञानिकांचं मत आहे की, कधी बर्फाखाली दबल्याने आणि कधी बर्फ वितळल्याने जमीन वर आल्याने ही रहस्यमय डिझाइन तयार झाली आहे.

यूएस जिओलॉजिकल सर्वेनुसार, पॅटर्न माती आणि दगड यातील बदलांचा हा परिणाम होऊ असू शकतो. तर नासाचे वैज्ञानिक म्हणतात की, या रेषा त्यांच्यासाठी अजूनही रहस्य आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कोल्हापूरमध्ये कोरोना साहित्य खरेदीत ३५ कोटींचा घोटाळा ? भाजपचा गंभीर आरोप

हाथरस पुन्हा हादरले : मुलीची छेड काढणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्या वडिलांची डोक्यात गोळ्या घालून हत्या