in ,

भिवंडीत मित्राची मस्करी पडली महागात, गुदद्द्वारात मशीननं हवा भरल्याने एकाचा मृत्यू

मोठा वाहनांच्या टायरमध्ये हवा भरणाऱ्या कॉम्प्रेशन प्रेशर मशीनचा पाईप मस्करीत तरुणाच्या गुदव्दारात लावून पोटात हवा भरण्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना भिवंडी शहरातील सिल्क मिल्स लूम कारखान्यात घडली आहे.

याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दोघा कामगारांवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुन्ना व बिट्टूकुमार असे अटक केलेल्या कामगारांची नावे आहेत. तर अब्दुल रफिक मन्सुरी (वय ३२) असे पोटात हवा शिरल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंबरनाथमध्ये परदेशात जाऊन आलेल्या मुलीला कोरोना

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर