in ,

नागराज मंजुळे नव्या रूपात; ‘या’ वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला

प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते नागराज मंजुळे हे नेहमी त्यांच्या वेगवेगळ्या चित्रपटांबद्दल चर्चेत असतात, नागराज मंजुळे फक्त चित्रपट निर्माते नसून ते चित्रपटात अभिनयाचे काम सुद्धा करतात. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’ हे चित्रपट खुप गाजले. ‘नाळ’ चित्रपटात त्यांनी एका भुमिकेत काम सुध्दा केले.

नागराज मंजुळे हे आता एका नवीन वेबसीरीमध्ये काम करताना दिसणार आहेत. सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या ‘मटका किंग’ नावाच्या वेबसीरीजमध्ये काम करणार आहे. ही वेबसीरीज सट्टेबाजीवर आधारित असणार असून ही वेबसीरीज सत्य घटनेवर आधारित असणार आहे.

रतन खत्री यांच्या जीवनावर ही आधारित असणार आहे. रतन खत्री यांना भारतात जुगाराचे संस्थापक म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर त्यांना ‘मटका किंग’ म्हणून ओळखले गेले. ह्या वेबसीरीज मध्ये त्यांचा जीवन प्रवास सांगितला आहे.

60 ते 70 च्या दशकातील मुंबईच्या मजुर वर्गाची संस्कृती पाहायला मिळेल. ही वेबसीरीज अनोखी व मनमोहक असणार आहे. असे नागराज मंजुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देशभरात सलग दुसऱ्या दिवशी नवीन कोरोनाबाधित आढळले

अभिनेत्री क्रांती रेडकर दिग्दर्शित ‘हा’ सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!