in

नाम बडे… : जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव

जगातल्या सगळ्यात मोठ्या स्टेडियमचं उद्घाटन गुजरात येथील अहमदाबादमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते बुधवारी झालं. या कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा हेही उपस्थित होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीचं स्वप्न पूर्ण झालं. या स्टोडीयमला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावने ओळखलं जाईल,’ असं शहा यांनी सांगितलं. महत्वाचे म्हणजे, आज (बुधवारी) या स्टेडियममध्ये भारत इंग्लडमध्ये क्रिकेट संघांदरम्यान ‘पिंक बॉल मॅच’ खेळला जाणार आहे.
या स्टेडीयममध्ये उत्तम सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत, 6 महिन्यात या स्टेडियममध्ये ऑलिंम्पिक, एशियाई आणि कॉमनवेल्थ स्पर्धा खेळवल्या जातील. या स्टेडियममुळे गुजरातला स्पोर्ट सिटी म्हणून ओळखलं जाईल. मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी हे स्वप्न बघितलं होतं. त्यांच हे स्वप्न आता पूर्ण झालं आहे. हे जगभरातील सगळ्या मोठं आणि सगळ्यात जास्त आसनक्षमता असलेलं स्टेडियम आहे. याकडे जगभरातील नागरिकांच्या नजरा असतील, असं अमित शहा यांनी सांगितलं.
या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आजपासूनच (बुधवार) पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाणार आहे. भारत आणि इंग्लडमध्ये तिसऱ्या टेस्ट मॅचची सुरुवात होणार आहे.

स्टेडियममध्ये काय आहे खास?
स्टेडियम जगभरातील सगळ्यात मोठं स्टेडियम आहे. या स्टेडियममध्ये सगळ्यात जास्त अर्थात 1 लाख 32 हजार लोकांना बसवण्याची व्यवस्था आहे. मात्र कोरोनामुळे सध्या 50 टक्के प्रेक्षक या स्टेडियममध्ये बसू शकतील. या स्टेडियमआधी मेलबर्न येथील स्टेडियम हे जगातलं सगळ्यात मोठं स्टेडियम होतं. या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, 4 चेंजिंग रुम यासह 3 प्रॅक्टिस ग्रॉऊंड आहेत. पावसाळ्यात पाणी भरू नये, यासाठी आधुनिक यंत्र स्टेडियममध्ये असतील. पाऊस झाल्यानंतर अर्ध्या तासात परत मॅच खेळता येऊ शकेल. यासह डे-नाईट मेचसाठी विशेष एलईडी लाइट्स आहेत. एलईडी लाइट असलेले जगातलं हे पहिलं स्टेडियम आहे. हे स्टेडियम ऑलिंम्पिकच्या 32 फुटबॉल ग्राऊंडच्या बरोबरीचं एक ग्राऊंड आहे. लाल आणि काळ्या मातीचे 11 पिच याठिकाणी तयार करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, जगातलं हे एक असं ग्राऊंड आहे, जिथे मुख्य आणि टेस्टिंग पिच हे एकाचं मातीपासून बनवण्यात आलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG 3rd Test : इंग्लंडचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय

West Bangal Election: क्रिकेटर मनोज तिवारीची नवी इनिंग; तृणमूल काँग्रेसमध्ये केला प्रवेश