in

पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रावर मोक्का अंतर्गत कारवाई

पुणे शहरातील उद्योजक नाना गायकवाड आणि त्यांचा मुलगा गणेश गायकवाड याच्यासह पाच जणांवर (मोक्का) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

पत्नीला शाररिक आणि मानसिक त्रास देणे, जमीन बळकावणे यासह इतर गुन्ह्यात आरोपी असलेला गणेश गायकवाड आणि त्याचे वडील नाना गायकवाड यांच्यासह त्यांच्या साथीदारांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.सर्व आरोपींनी संघटित गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करत वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी संघटीतपणे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाल्याने मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

नाना गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्यावर एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये दंगा करुन खुनाचा प्रयत्न करणे, गुलाम बनविण्याच्या इराद्याने अपहरण करुन मारहाण करणे, कट रचून बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करणे, खंडणी उकळण्यासाठी मारहाण करणे, दरोडा घालणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. संबंधित गुन्हे हे पिंपरी चिंचवडमधील हिंजवडी, सांगवी, पुणे शहरातील चतुर्श्रुंगी, चंदननगर आणि पुणे ग्रामीण पौड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत.

दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि राजकारणी गणेश गायकवाड यांनी ज्योतिषी रघुनाथ येमूल याच्या सल्ल्यानुसार पत्नीवर अघोरी प्रथांचा वापर करुन छळ केला होता. या घटनेनंतर ते फार चर्चेत आले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सरकारने सोडलं वाऱ्यावर… पूरग्रस्तांसाठी स्थानिकांनी लावला फलक

ऑलिम्पिकमधील खेळाडू लाल किल्ल्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार