लोकशाही न्यूज नेटवर्क | माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला आहे. याप्रसंगी सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, भाई जगताप आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून पटोले यांचे नाव महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत होते, याचं कारणामुळे राजीनामा दिल्याची चर्चा होती. त्यानंतर नाना पटोले यांच्या नावाची घोषणा झाली होती.
आज माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला आहे. नाना पटोले हे काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष तर त्यांच्या दिमतीला 6 कार्याध्यक्षही देण्यात आले आहेत. याशिवाय दहा उपाध्यक्षांची फौजही आहे.
कार्यकारी अध्यक्ष कोण?
- शिवाजी मोघे (यवतमाळ)
- बस्वराज पाटील (उस्मानाबाद)
- नसीम खान (मुंबई)
- कुणाल पाटील (धुळे)
- चंद्रकांत हंडोरे (मुंबई)
- प्रणिती शिंदे (सोलापूर)
काँग्रेसचे 10 नवनियुक्त प्रदेश उपाध्यक्ष कोण?
- शिरीष चौधरी (जळगाव)
- रमेश बागवे (पुणे)
- हुसैन दलवाई (मुंबई)
- मोहन जोशी (पुणे)
- रणजीत कांबळे (वर्धा)
- कैलाश गोरंट्याल (औरंगाबाद)
- बी. आय. नगराळे
- शरद अहेर (नाशिक)
- एम. एम. शेख (औरंगाबाद)
- माणिकराव जगताप (रायगड)
Comments
Loading…