in ,

तुम्ही मोदी सरकारच्या दबावाखाली आहात का? नाना पटोलेंचा बिग बी आणि अक्षयला सवाल

बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे शूटिंग आणि चित्रपट बंद पाडू, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल (18 फेब्रुवारी) दिला. त्यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिल्या. आता पटोले यांनी याचा पुनरुच्चार करताना, ‘तुम्ही मोदी सरकारच्या दबावाखाली आहात का,’ असा सवाल त्यांनी या अभिनेत्यांना केला.

मनमोहनसिंह पंतप्रधानपदी असताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत वाढत असून देखील इंधनाचे दर कमी ठेवले होते. त्यावेळी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी ट्विट करून इंधन पाच ते 10 रुपयांत विकण्याची मागणी केली होती. पण मोदी सरकार ज्या प्रमाणात इंधन दरात वाढ करत आहे, ते पाहता हे अभिनेते आता ट्विट का करीत नाहीत, असा सवाल नाना पटोले यांनी केला.

तुम्ही मोदी सरकारच्या दबावाखाली आहात का, असा सवाल करून पटोले म्हणाले की, जे तिकिटे खरेदी करून तुमचे चित्रपट पाहतात, त्यांच्याकरिता जे आवाज उठवणार नाहीत, त्यांचे चित्रपट महाराष्ट्रात पाहिले जाणार नाहीत आणि शूटिंगही होणार नाही. ही धमकी नव्हे. ही लोकशाहीच्या दृष्टीने आम्ही सांगत आहोत. तुम्ही लोकप्रिय व्यक्ती आहात आणि तुमचे ते उत्तरदायित्व आहे, असे त्यांनी सांगितले.

फडणवीसांना उत्तर
नाना पटोले यांच्या याच भूमिकेवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. तथापि, फडणवीसांचे वक्तव्य फारसे मनावर घ्यायचे कारण नाही. मी जनतेच्या मनातील भावना व्यक्त केली. भाजपा नेत्यांना एवढ्या मिरच्या झोंबण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीचा झाला त्रास…नुकसान भरपाई म्हणून केली कोर्टात पाच कोटींची मागणी

उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के