in ,

OBC Reservation | “ओबीसींच्या आरक्षणावर घाला…हे भाजपाचं पाप”

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. यासंबंधी याचिका राज्य सरकारने दाखल केली होती. मात्र ओबीसी समाजाचं आरक्षण रद्द झाल्याने आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ओबीसी समाजावर अन्याय करण्याची प्रवृत्ती ही मोदी सरकारची असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार केलाय. ओबीसींच्या आरक्षणावर घाला…हे भाजपाचं पाप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हा विषय घटनापीठापुढे नेण्याची मागणी त्यांनी केलीय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजाच्या राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक नुकसानीची सुरुवात झाल्याचं त्यांनी म्हटलंय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रसिद्ध गायक सोनू निगम गोल्फ पटू क्रिशिव टेकचंदानी यांनी कोरोना लसीकरण मोहीमेचे केले आयोजन

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, कोरोना काळात अनाथ झालेल्यांसाठी १० लाखांचा निधी