in

भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन

नुकतेच नरेंद्र मोदी आणि देशातल्या बड्या नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे. संपूर्ण देशभरात कोरोना लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेच वातावरण आहे. मध्य प्रदेशमधील खंडवाचे भाजपचे खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नंदकुमार सिंह चौहान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंगारकी चतुर्थीच्या निम्मिताने विठ्ठल मंदिराला दुर्वाची आरास

फेसबुकला दणका ; ४,७८३ कोटींची भरपाई द्यावी लागणार