in

नंदुरबार जिल्हा बनला कोरोनाचा हॉटस्पॉट

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच नंदुरबार जिल्हा बनला कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याची माहितीम समोर येत आहे. नंदुरबार मध्ये गेल्या पंधरादिवसात वाढलेल्या कोरोणा रुग्णसंख्येमुळे जिल्ह्यातले शासकीय आणि खाजगी रुग्णालये पूर्ण भरलेली असून, रुग्णांना बेड मिळत नसल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयाच्या द्वारावरच बेड नसल्याचा बोर्डच प्रशासनाने लावल्याने यावरुनच जिल्ह्यातील कोरोणाच्या विपरीत परिस्थीचा अंदाज येत आहे . त्यातच याठिकाणी ३० परिचारीकांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र त्यातील अवघ्या पाच परिचारीका हजर झाल्या आहे.

तर दुसरीकडे शासकीय कोव्हीड रुग्णालयात ७ डॉक्टर्सची कमतरता असतांना आहे त्यापैकी काही डॉक्टर्सनी राजीनामा दिला आहे. सध्या ८० ऑक्सीजन बेडची सुविधा असलेल्या शासकीय कोव्हीड रुग्णालयता तब्बल १५० रुग्ण ऑक्सिजन वर आहे. त्यामुळेच ऑक्सिजन प्लॅन्टची क्षमता कमी पडत असुन पुन्हा खाजगी पुरवठादाराकडुन ऑक्सिजन सिलेंडर घ्यावे लागत आहे. प्रशासनाने ही बाब ओळखुन याठिकाणी दुसऱ्या एक ऑक्सिजन प्लॉन्टचे काम सुरु केले आहे. त्यामुळेच सध्या तरी नंदुरबारमधील वाढती कोरोणा रुग्ण संख्या चिंतेचा विषय बनली आहे. नंदुरबार मधील आतापर्यत कोरोना रुग्णांची संख्या १६७९६ झाली आहे. तर आता पर्यत २७६ रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंढरपूर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी, महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसेंचा उमेदवारी अर्ज

सोयगाव पंचायत समितीच्या सभापती पदी शिवसेनेच्या प्रतिभा जाधव