in

थोड्याच वेळात नारायण राणे न्यायालयात हजर राहणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपासंदर्भात जामिनावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे.

नारायण राणे हे सध्या मुंबईमधील जुहू येथील निवासस्थानी असून ते पावणेबाराच्या सुमारास अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहेत. दुपारी एक वाजेपर्यंत ते अलिबागमध्ये पोहचणार असल्याची माहिती समोर आली आहे. आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे.

नारायण राणे यांचे वकील संग्राम देसाई यांनी आज सकाळी राणेंच्या जुहू येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतल्यानंतर यासंदर्भातील माहिती दिली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी अटक झाल्याच्या दिवशीच रात्री जामीन मंजूर करताना महिन्यात दोनवेळा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावण्याची अट घातली होती. मात्र, मागील वेळेस नारायण राणे यांनी प्रकृतीचं कारण देत हजेरी लावली नव्हती. आज मात्र नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर पहिल्यांदात पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत.

दरम्यान आजच या प्रकरणासंदर्भात राणे यांचा जामीन नोंदवला जणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण राणे आज अलिबागमध्ये येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नैवेद्याच्या वेळी बाप्पा आणि गौरीच्यामध्ये पडदा का धरतात?

विराट कोहली कर्णधारपद सोडणार ?