in

”संजय राऊत संपादक म्हणून लायकीचे नाहीत”

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर त्यांच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली.या अटकेनंतर रात्री उशिरा त्यांना जामीन मंजूर झाला. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उत्तरं दिली.

संजय राऊत यांनी आपल्या अग्रलेखात राणे नारायण राणे म्हणजे छेद पडलेला फुगा असे म्हटले आहे. यावर राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत हे संपादक म्हणून लायकीचे नाहीत. जे फक्त उद्धव ठाकरे खूश होतील इतकेच लिहितात. राऊतांना 17 तारखेनंतर उत्तर देईन, अशी प्रतिक्रिया राणे यांनी दिली आहे.

अग्रलेखात काय ?

नारायण राणे हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत त्यांचे जे नाव झाले, ही शिवसेना या चार अक्षरांची कमाई. शिवसेना सोडल्यानंतर राणेंचा लोकसभा व विधानसभा मिळून चार वेळा पराभव झाला. त्यामुळे राणे यांचे थोडक्यात वर्णन करायचे तर भोकं पडलेला फुगा असेच करता येईल. हा फुगा कितीही हवा भरुन फुगवला तरी वर जाणार नाही, पण भाजपने सध्या हा भोकवाला फुगा फुगवून दाखवायचे ठरवले आहे. राणे यांना काही लोक ‘डराव डराव’ करणाऱ्या बेडकाचीही उपमा देतात. राणे हे बेडूक असतील किंवा भोकवाला फुगा, पण राणे कोण? हे त्यांनी स्वतःच जाहीर केले, ‘मी नॉर्मल माणूस नाही’ असे त्यांनी जाहीर केले. मग ते अबनॉर्मल आहेत ते तपासावे लागेल.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संगळ्यांना मी पुरून उरलोय; नारायण राणेंचं थेट आव्हान

ENG vs IND 3rd Test : लंचपर्यंत भारताचा डाव ४ बाद ५६ धावा