in

पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे साधला जनतेशी संवाद

पंतप्रधान मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमाद्वारे देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी देशातील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आणि त्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक झाल्यानंतर ऑक्सिजनमुळे हाहाकार उडाला होता. देशात सगळीकडे करोनाची ओरड सुरू झाल्याने सरकारने पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या.

यावेळी त्यांनी चक्रीवादळांबद्दलही भाष्य केलं पश्चिम किनारपट्टीवर तौते चक्रीवादळ धडकलं, तर पूर्व किनारपट्टीवर यास चक्रीवादळाने तडाखा दिला. देश आणि देशातील जनता पूर्ण ताकदीने या चक्रीवादळाशी लढली आणि त्यात कमीत कमी जीवितहानी होईल याची खबरदारी घेतली. पूर्वीच्या तुलने आता जास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवता येणं शक्य झाल्याचंही दिसत आहे. या आपत्तीमध्ये प्राण गमावलेल्या कुटुंबियांनच्या दुख:मध्ये मी सहभागी आहे . असे देखील ते यावेळी म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विनोदी अभिनेता भूषण कडूच्या पत्नीच करोनामुळे निधन

वसई विरार महापालिकेच्या केंद्रावर फ्रंटलाइन सीफेरर्सचे प्राधान्यक्रमाने होणार लसीकरण