in

नवनीत राणा उतरल्या व्हॉलीबॉलच्या मैदानात… रंगला आमदार विरुद्ध खासदार सामना

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे दाम्पत्य वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतात. सध्या हे दाम्पत्य व्हॉलीबॉल खेळत असल्यामुळे चर्चेत आले आहे. यावेळी दोघांनीही व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद लुटला.

राणा दाम्पत्य बुलेटवर फेरफटका मारताना, तर नवनीत राणा महिलांसोबत गरबा खेळताना आपण पाहिले असेलच. आता राणा दाम्पत्य आणखी एका कारणामुळे चर्चेत आले आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात होळी साजरी करण्यासाठी नवनीत राणा आणि रवी राणा आले आहेत.

याचवेळी राणा दाम्पत्याने आपल्या गाडीचा ताफा रस्त्यावर थांबवत आदिवासी युवक खेळत असलेल्या व्हॉलीबॉलच्या मैदानात उतरल्या. नवनीत राणा आणि रवी राणा या दोघांनीही थेट मैदानवर उतरत युवकांसोबत व्हॉलीबॉल खेळला. तसेच 28 मार्चला सुद्धा रवी राणा यांनी युवकांसोबत क्रिकेट तसेच रात्री खासदार नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत आदिवासी नृत्य केलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

बलात्कार पीडितेची गावकऱ्यांनी काढली धींड

कल्याण-डोंबिवलीत नियमांचं उल्लंघन करून वाईन शॉप सुरूच