in

जातवैधता प्रमाणपत्र प्रकरण : खासदार नवनीत राणांना २ लाखांचा दंड

अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत रवी राणा यांचं जातवैधता प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. याशिवाय त्यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला असून सहा आठवड्यात जातीचा दाखला व जातवैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून व बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला.

या निर्णयामुळे राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. न्या. आर. डी. धानुका व न्या. व्ही. जी. बिश्त यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. तसेच दंडाची रक्कम महाराष्ट्र विधि सेवा प्राधिकरणाकडे दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश दिले.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा उमेदवार होत्या. २०१९ मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करीत त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या. अडसूळ यांनी राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे २०१८ मध्येच आव्हान दिले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona Vaccination : स्पुतनिक लसीसाठी मुंबईत जम्बो शीतगृह

Covid Vaccination : ७४ कोटी डोससाठी केंद्रानं दिली ऑर्डर