in ,

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत बेफाम डान्स!

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचे संसर्ग वाढू नये यासाठी वारंवार मास्क घालण्याचे सरकारकडून आवाहन केले जात आहे. पण, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनीच कोरोनाचे नियम पायदळी तुडवली आहे. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्य केले आहे.

खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षापासून ची परंपरा जोपासली आहे. परंतु, हे करत असताना नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणांना मास्क घालण्याचा सपशेल विसर पडला. दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात काही जण मास्क घालून होते. पण, खासदार नवनीत राणा यांनी कोरोनाचे नियमांची ‘होळी’ केली. मास्क न घालताच नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक नृत्यावर ठेका धरला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पंतप्रधान मोदींच्या बाग्लांदेश दौऱ्यानंतर हिंसा

भरधाव ट्रकची मिठाईच्या दुकानाला टक्कर; अपघातात 16 जणांना चिरडलं