राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशातच खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा हे आदिवासी बांधवा सोबत होळी साजरी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात गेले आहेत. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाटात आदिवासींसोबत होळी खेळण्याची आपली गेल्या 11 वर्षापासून ची परंपरा जोपासली आहे.
परंतु या सर्वमध्ये कोरोनाच्या नियमनाचे पालन केले गेले नाही. बॅटींग करत क्रिकेटचा आनंद लुटला तर जिल्हात कोरोनाचा उद्रेक सुरू असतांना राणा दाम्पत्याने सोशल डिस्टनचे पार तीनतेरा बाजवले दोघांच्या तोंडाला मास्क नव्हता त्यामुळे कोरोना नियम या राना दाम्पत्याने पुन्हा धाब्यावर बसवले असल्याने कोरोना नियम सर्वसामान्य माणसालाच का ? हा प्रश्न पुन्हा यावेळी उपस्थित होत आहे.
राज्यात कोरोनाचीस्थिती अतिशय बिकट होत आहे. कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यात आज, रविवारी मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने कडक निर्बंध लागू करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते.
Comments
Loading…