in

“चंद्रकांत दादा जरा डोकं शांत ठेवून टीका करा….”

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता संदीप काळे यांनी पाठवले चंद्रकांत पाटील यांनी पाठवले नवरत्न तेल

अमोल धर्माधीकारी, पुणे
राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांत चांगलेच कलगीतुरे रंगताना पहायला मिळत आहेत. त्यातच सांगली येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. मात्र या वक्तव्याचा निषेध करत पुण्यातील एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांना थेट नवरत्न तेल डोक्याला लावण्यासाठी पाठवले आहे. संदीप काळे असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे.

यावर उत्तर देताना काळे यांनी म्हटले, “आपण कुणाबद्दल बोलतो, आपली तेवढी उंची आहे का, बोलताना जरा डोकं शांत ठेवून टिका करत जा, म्हणून हे नवरत्न तेल तुमचं डोकं शांत करण्यासाठी पाठवत आहे. आणि तरीही तुमचं डोकं शांत नाही झालं तर, त्याचा इलाज मी स्व..खर्चाने करतो,” असा इशारा या कार्यकर्त्याने दिला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची प्रकृती स्थिर, सोशल मिडीयावर निधनाची अफवा

BiggBoss Marathi :महेश मांजरेकरांनी मीरा ला सुनावले खडेबोल