in

‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या

केंद्र सरकार आणि ट्विट यांच्यातला वाद तापलेला असतानाच,ट्विटरनेही उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक भाजप व आरएसएस नेत्यांच्या ट्विटर अकाउंटची “ब्लू टीक” काहीकाळ हटवून पुन्हा बहाल केली. या प्रकरणावरून विरोधकांनी केंद्रावर टीका केली होती. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवाब मलिक यांनी भाजपाला टोला लगावला आहे.

‘ब्लू टीक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा असे सांगतानाच ‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यावा असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. “ट्विटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टीक’ ची लढाई लढताना दिसत आहे तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहे,” असे नवाब मलिक यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेडपी अध्यक्षाच उपोषण

शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीकडे सर्वांच लक्ष… मराठा आरक्षणाची दिशा ठरणार?