in ,

शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून हत्या केल्याचे परिणाम दिसतायत; मलिकांची भाजपवर जळजळीत टीका

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजताच राजकारण ढवळून निघाले आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये भाजपला गळती लागली आहे तर काही नेते पक्षातही प्रवेश करत आहेत. या सर्वात राष्ट्रवादी पक्षही उत्तर प्रदेशच्या राजकीय आखाड्यात उतरली आहे.त्यामुळे आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांची हत्या केल्याचे परिणाम आता दिसू लागले असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली होती.

उत्तर प्रदेश निवडणूकींबद्दल बाेलताना नवाब मलिक यांनी, “उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस कमकुवत हाेत चालली आहे.” असे म्हटले आहे तसेच शरद पवार यांच्या “भाजपच्या विरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं.” ह्या वक्तव्याची आठवण करून देत ते म्हणाले, “आमची काँग्रेस सोबत अनेक ठिकाणी युती आहे मात्र आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने लक्ष्यात घ्यायला हवं आणि इतर पक्षासोबत यायला हवं.”

निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी लढवणार असलेल्या जागांविषयी बाेलताना ते म्हणाले “एक जागा आम्हाला देण्यात आली आहे. आणखी जागांबाबत देखील प्रफुल पटेल, अखिलेश यादव यांच्यासोबत चर्चा करत आहाेत.” पाच राज्यातील निवडणूका जाहीर झाल्यानंतर सुरू झालेल्या आमदार तसेच मंत्र्यांच्या राजीनाम्यांच्या सत्राविषयी बाेलताना “उद्या देखील एक मोठी घटना घडणार आहे.” असा गाैप्यस्फाेट देखील त्यांनी केला. दलित, मजूर, शेतकरी ह्यांच्यावर अन्याय हाेत आहे तसेच, शेतकर्यांच्या अंगावर गाडी चालवून त्यांची हत्या केल्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत, असेही ते म्हणाले.

“२०१७ मध्ये काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामूळे गाेव्यामध्ये भाजपची सत्ता आली” असेही ते म्हणाले.”आमची भूमिका आहे महाविकास आघडी प्रमाणे गोवा विकास आघाडी करावी. परंतु काँग्रेस सकारात्मक नाही. अपेक्षा आहे ते आमच्या सोबत गोव्यात येतील.”

ज्या राज्यात जाे पक्ष माेठा आहे, त्या पक्षासाेबत त्या राज्यात लढायचे असे राष्ट्रवादीने ठरवले असल्याचे ते म्हणाले. “शिवसेना 50 ते 100 जागा लढणार आहे तो त्यांचा निर्णय आहे मात्र आम्ही सपासोबत जाणार आहोत आमचं ठरलं आहे.” असे म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्याचे समर्थन केले.

दुकानांवरील मराठी पाट्यांवर म्हणाले…

“सरसकट मराठी पाट्या लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना इतर भाषेच्या पाट्या देखील लावण्याचा अधिकार आहे. मराठी सोबत गुजराती, उर्दू इंग्रजी पाट्या लावण्याचा मुभा आहे”, असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांना मलिक यांनी दिले.

नारायण राणेंना टोला

नारायण राणेंविषयी बोलताना ते म्हणाले, “गल्लीची स्पर्धा जिंकल्यानंतर वर्ल्ड कप जिंकण्याची स्वप्न आता नारायण राणे पाहत आहेत. गल्लीच्या राजकारणात दादागिरी करून सत्ता मिळवली आहे. देशातील सत्ता अशी मिळवता येत नाही.”

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्ध्यात मनसेला धक्का; प्रदेश उपाध्यक्षासह 28 कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अखेर १८ दिवसांनी नितेश राणे आले समोर…