in

“समीर दाऊद वानखेडेचं आणखी एक फर्जिवडा केंद्र”, नवाब मलिकांकडून आणखी एक ट्विट

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांनंतर एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी एक ट्विट करून या कथेमध्ये एक नवा ट्विस्ट निर्माण केला आहे. तसेच नवाब मलिकांच्या नव्या आरोपांमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दरम्यान “समीर दाऊद वानखेडेचं आणखी एक फर्जिवडा केंद्र” असे म्हणत नवाब मलिक यांनी रेस्टॉरटचा फोटो ट्विट केला आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे हे जन्मापासून मुस्लिम असल्याचे त्यांच्या जन्मदाखल्यामुळे स्पष्ट झाले आहे. समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि शाळेचा दाखला तसेच इतर काही कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहेत. समीर वानखेडे यांनी १९९३ मध्ये खऱ्या कागदपत्रांमध्ये खाडाखोड करुन नवीन दाखले काढले. यामध्ये त्यांनी जुने रेकॉर्ड देखील नष्ट केले पंरतु ते विसरले की महानगरपालिकेतील सर्व कागदपत्र स्कॅन करुन ठेवले आहेत. त्यामुळे ते अजूनही आहेत. कोणीही कम्प्यूटरमधून काढून घेऊ शकतात असे नवाब मलिक म्हणाले. वानखेडेंच्या नव्या जन्मप्रमाणपत्रावर हिंदू असा उल्लेख आहे परंतु ते जन्मप्रमाणपत्र खोटं असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ST Workers Strike | एसटी महामंडळाच्या खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब : सूत्र

वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची पंतप्रधानांची घोषणा