in

समीर वानखेडेंकडून बनावट कागदपत्र दाखल – नवाब मलिक

अमली पदार्थ प्रतिबंधक विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (N awab Malik) यांनी केला आहे. मलिक यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयात (High Court) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. वानखेडेंचा शाळेचा प्रवेश अर्ज आणि शाळा सोडल्याचा दाखला याचीही कागदपत्रे मलिक यांनी दिली. यानंतर नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडेंकडून बनावट कागदपत्र दाखल करण्यात आली आहे अशा आरोप मलिकांनी केला आहे.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणी मलिक यांनी आज उच्च न्यायालयात आणखी कागदपत्रे सादर केली. मलिक यांनी आज प्रतिज्ञापत्रही सादर केले असून, त्यात समीर वानखेडे यांचा शाळा प्रवेशाचा अर्ज आणि प्राथमिक शाळा सोडल्याचा दाखलाही आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्ये वानखेडे हे मुस्लिम असल्याचा उल्लेख आहे. मलिक यांच्या वकिलांनी न्यायाधीश माधव जमादार यांच्यासमोर हे म्हणणे मांडले. यावर उद्या दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस अडचणीत, 20 नेत्यांनी दिला पक्ष पदाचा राजीनामा

‘काही शक्ती गांधींच्या भारताला गोडसेचा भारत करण्याचा प्रयत्न करताहेत’