in

मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ; नवाब मलिक यांचं ट्विट

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज क्रुझवरील ड्रग्ज पार्टी संदर्भात पत्रकार परिषद घेऊन पोलखोल करणार आहेत. त्याआधी मलिक यांनी एक शेर ट्विट केला असून त्यामुळे त्यांच्या या सूचक ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्विट केलं आहे. मुख़ालिफ़त से मेरी शख़्सियत और निखरती है, मैं अपने दुशमनों का बड़ा एहतराम करता हूँ।, असं सूचक ट्विट त्यांनी केल्याने त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

नवाब मलिक यांनी याआधी एनसीबीला सवाल केले होते. यावेळी त्यांनी एनसीबीला एक सवाल केला आहे. क्रुझवरील कारवाईमध्ये 10 लोकांना पकडलं होते, मात्र त्यापैकी 2 लोकांना सोडले असल्याचे समोर आले आहे. जे दोघे सोडण्यात आले त्यामध्ये भाजपच्या एका नेत्याचा मेहुणा असून याबाबतचा भांडाफोड उद्याच्या पत्रकार परिषदेत करणार असल्याचं मलिक यांनी केला. त्या दोन लोकांना NCB कार्यालयात आणण्यात आले होते आणि काही तासांनी त्यांना सोडण्यात आले आहे. हे जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. सगळा प्रकार समोर येईल म्हणून त्यांना सोडण्यात आले आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, असे मलिक म्हणाले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको’; वाघ यांचा चाकणकरांना टोला

एनसीबीनं माझ्या जावयाला खोट्या प्रकरणात फसवलं – नवाब मलिक